पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जंम्बो कार्यकारीणी जाहिर केली आहे. सांगवी येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार आण्णा बनसोडे, विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी पक्षनेते जगदीश शेट्टी, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिंचवड विधासभा अध्यक्ष शेखर चंद्रकांत काटे, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष : अमर आदियाल, आकाश जगदिश शेट्टी, निखिल उमाकांत दळवी, श्रीकांत नागेश धनगर; पिंपरी चिंचवड शहर संघटक : प्रसाद चव्हाण, कृष्णा पाटील; पिंपरी चिंचवड सरचिटणीस : पृथ्वीराज बोऱ्हाडे, युवराज भोंडवे, अॅड. राकेश गुरव, किरण काकडे, सनी मेहता; चिंचवड विधानसभा संघटक : महेश संजय काळे; प्रभाग 23 अध्यक्ष : आशिष अशोक जगताप; प्रभाग 24 अध्यक्ष : विकास शांताराम असवले ; प्रभाग 25 अध्यक्ष : संतोष खांडेकर; प्रभाग 9 उपाध्यक्ष : अशोक देवकर; प्रभाग 23 वॉर्ड अध्यक्ष : निलेश भारत कसबे, आकाश गोरख वाघमारे, आझम अमिन शेख, युनूस इमाम शेख, प्रभाग 24 वॉर्ड अध्यक्ष : अझहर वझीर सौदागर, अमोल बापूसाहेब भगत, प्रसाद दिनकर शेडगे, दिगंबर एकनाथ भुसारे; प्रभाग 25 वॉर्ड अध्यक्ष : अतुल अंकुश काटे; प्रभाग 10 वॉर्ड अध्यक्ष : प्रशांत नागेश माने, उमेश विश्वनाथ देवकाते; प्रभाग 10 वॉर्ड सरचिटणीस : अनमोल देवानंद कांबळे, प्रभाग 10 वॉर्ड सचिव : सुरज प्रभाकर गायकवाड; प्रभाग 10 वॉर्ड संघटक : राहुल कल्याण ढवळे, योगेश कांबळे, प्रवीण कांबळे, प्रवीण चौधरी, शुभम अडागळे, अजय कांबळे, कुणाल सोनकांबळे, संदश कांबळे, शुभम कु-हाडे, संजय कांबळे, ऋषिकेश महारनोर, आराध्य भोसले, सागर पाटील, सिध्दार्थ शिंदे, रोशन यादव, सिध्दांत शर्मा, अभिषेक यादव यांना पत्र देण्यात आले.