पिंपरी (Pclive7.com):- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राहुल कलाटे फाऊंडेशन आयोजित वुमन्स क्रिकेट लीग वाकड २०२२ चे बक्षिस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक चोंधे पाटील टीम ने पटकावले. द्वितीय पारितोषिक टीम अव्हेंजर, तृतीय पारितोषिक टीम फ्रंटलाईन, व चतुर्थ पारितोषिक टीम प्रेसिडेंटने पटकावले.
दिवस रात्र चालणाऱ्या या सामन्यांमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी सौ. शीतलताई पवार (कार्यकारी संपादक सकाळ पुणे), शिवसेनेचे मा.गटनेते राहुल कलाटे, सौ. सारिकाताई श्रीखंडे (सामाजिक कार्यकर्त्या, निसर्गप्रेमी), श्री. किरणजी वडगामा, श्री. शंभूजी घसीटा, श्री. दत्तात्रयजी देशमुख, श्री. सुधीरजी देशमुख, श्री. शिवाजीराव कटके, श्री. विठ्ठलतात्या कलाटे, श्री. विजयजी कलाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.