पिंपरी (Pclive7.com):- श्रावण महिन्यानिमित्त पुण्यातील तीन युवकांनी पुणे ते केदारनाथ असा १९०० किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला. पुण्याच्या चिंबळी गावातील सुपुत्र श्री स्वप्नील भुमकर तसेच देहु गावातील श्री रमेश खाडे आणि तळेगाव मावळ मधील श्री राघवेंद्र बेनाडे यांनी श्री संत तुकाराम महाराज मंदिर देहुगाव पासुन सुरू करत थेट उत्तराखंड केदारनाथ मंदिर येथे सुमारे ४४ किलोमीटर सायकल सोबत घेऊन पायी ट्रक करत श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी ‘मेरी माठी मेरा देश’ आणि ‘भगवान की खोज’ असा अनोखा सामाजिक संदेश देत पुर्ण केला.

या सायकल प्रवासाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, या प्रवसात आम्हला कोणतीही अडचण आली नाही. संपूर्ण प्रवासादरम्यान विविध ठिकाणी आमचे स्वागत झाले. स्थानिक नागरिकांनी उत्साहाने आमच्या मोहिमेबाबत चौकशी केली.

या अगोदर स्वप्नील भुमकर यांनी दोन वेळा दक्षिण दिग्विजय पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते वाघा बॉर्डर पंजाब तसेच पुणे ते कछ बार्डर गुजरात असे मोठमोठे सायकल प्रवास सामाजिक संदेश देत आजपर्यंत ३२,००० किलोमीटर सायकलवर यशस्वीरीत्या पुर्ण केले आहेत. राघवेंद्र बेनाडे यांनी देखील दक्षिण दिग्विजय पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते वाघा बॉर्डर पंजाब तसेच पुणे ते कछ बार्डर गुजरात असे मोठमोठे सायकल प्रवास सामाजिक संदेश देत आजपर्यंत २०,००० किलोमीटर सायकलवर पुर्ण केले आहेत. रमेश खाडे यांनी देखील दक्षिण दिग्विजय पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते हम्पी असे मोठमोठे सायकल प्रवास सामाजिक संदेश देत आजपर्यंत २७,००० किलोमीटर सायकलवर पुर्ण केले आहेत. वर्षातून एक तरी मोठी सायकल राईड करायचा आमचा मानस असतो त्या प्रकारे आम्हाला कुटुंबातून देखील पाठिंबा मिळतो.
आयएएस व विविध ग्रुपचे सहकार्य..
आजपर्यंतच्या देशभरातील राईटच्या वेळी या सायकलस्वारांना इंडो ॲथलेटिक्स सोसायटी चे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे स्कोडा फोक्सवॅगन, मोशी, पुरंदर, मावळ अशा विविध सायकलिस्ट ग्रुप यांचे सहकार्य लाभले. देहू येथील संत तुकाराम गाथा मंदिर येथून प्रस्थान केले. त्यावेळी मोशी वि.वि.का सोसायटीचे चेअरमन राहुलजी सस्ते, इंडो अथलेटिक सोसायटीचे गणेश भुजबळ, अजित पाटील, अर्णव बिल्डर्सचे तुषार सस्ते, मोशी सायकलिस्टचे अध्यक्ष नितीन घिगे (दाजी), ॲड. प्रशांत सस्ते, विशाल टेकाळे, दया सस्ते तसेच स्कोडा फोक्सवॅगन कंपनीतील अधिकारी अविनाश गोसावी, देहूगाव, मोशी, चिंबळी येथील ग्रामस्थ,राजकीय, वारकरी संप्रदयातील मान्यवर उपस्थित होते.