पिंपरी (Pclive7.com):- सलग तीन वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत विक्रमी रक्तदान करून घेणाऱ्या स्व. प्रशांत उर्फ पिंटू विनोदे प्रतिष्ठानच्या वतीने यंदा शुक्रवारी (दि.१) सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे.

युवा उद्योजक स्व. प्रशांत उर्फ पिंटू विनोदे यांच्या स्मरणार्थ ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात दरवर्षी हजारो तरुण रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावत. स्व प्रशांत विनोदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आयटीयन्स तरुणांचा रक्तदात्यात मोठा समावेश असतो. तर वाकड-हिंजवडी पंचक्रोशीतील तरुणही या शिबिरात हिरीरीने सहभागी होतात.
यावर्षी भुमकर-लक्ष्मी चौक रस्त्यावरील विनोदे डेव्हलोपर्स कार्यालयाजवळ विनोदे कॉर्नर विनोदे नगर वाकड येथे हे शिबीर संपन्न होणार असून जास्तीत जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करून या सामाजिक महा यज्ञाला हातभार लावावा असे आवाहन स्व. प्रशांत उर्फ पिंटू विनोदे प्रतिष्ठानच्या वतीने उद्योजक विक्रम विनोदे यांनी केले आहे.