पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आज (दि.१५) मोशी येथे सायंकाळी ५ वाजता महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघातून डॉ. अमोल कोल्हे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. महाविकास आघाडीने एकसंघपणे केलेल्या कामगिरीमुळे हा विजय साकारता आला. भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने एकदिलाने काम केले. त्यामुळेच भाजपचे आमदार असताना देखील भोसरीतील महाविकास आघाडीला लक्षवेधी मतदान मिळाले. म्हणूनच आज शनिवार दि.१५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता मोशी येथील साधुराम गार्डन मंगल कार्यालय येथे डॉ. अमोल कोल्हे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी दिली आहे.
Tags: खासदार डॉ. अमोल कोल्हेजाहीर सत्कारभोसरी विधानसभामहाविकास आघाडीमोशीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे