राहुल कलाटेंच्या वाढदिवसानिमित्त नवनाथ जगताप यांच्याकडून सांगवीत ‘फलकबाजी’
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना भावी आमदार अशा शुभेच्छा जगताप यांनी दिल्या आहेत. ऐंकून विश्वास बसणार नाही.. पण हे खरं आहे.. पण या शुभेच्छा तुम्हाला वाटतात ‘त्या’ जगतापांनी दिलेल्या नाहीत… राहुल कलाटे यांना वाढदिवसानिमित्त या शुभेच्छा नवनाथ जगताप यांनी दिल्या आहेत. अशा शुभेच्छांचे फलक सांगवीतील साई चौक आणि परिसरात लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांचे आणि त्यांचे चुलत बंधू नवनाथ जगताप यांचे संबंध ताणले गेले आहेत. तर त्याच दरम्यान नवनाथ जगताप आणि राहुल कलाटे यांची मैत्री देखील वाढली आहे… त्यामुळे आमदार जगताप यांना डिवचण्यासाठीच नवनाथ जगताप यांच्या समर्थकांकडून अशी फ्लेक्स बाजी केली गेल्याची चर्चा आहे…!
अर्थात या फ्लेक्सबाजीमुळे आमदार लक्ष्मण जगताप किती विचलित होतात हे आत्ताच सांगणे कठीण असले तरी लक्ष्मण जगताप यांचा गड मानल्या जाणाऱ्या सांगवीमध्ये अशा प्रकारची फ्लेक्सबाजी होणे, त्यांची चिंता वाढवणारी मात्र आहे…!





















Join Our Whatsapp Group