पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील लिनीयर अर्बन गार्डनचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लिनीअर अर्बन गार्डन असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका निर्मला कुटे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आज याबाबत निवेदन देण्यात आले आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठे (२ कि.मी) लांब असलेल्या गार्डनचे काम पिंपळे सौदागरमध्ये सध्या चालू आहे. पिंपरी चिंचवडच्या विकासात या गार्डनमुळे भर पडणार असून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये देखील पिंपळे सौदागर प्रभागाचा समावेश झाल्याने येथील विकासात आणखीनच भर पडणार आहे.