खान्देश मराठा मंडळातर्फे निगडी येथे प्रजासत्ताकदिनी पुरस्काराचे वितरण
पिंपरी (Pclive7.com):- जाहिरात क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये नावलौकिक मिळविलेल्या प्रचिती पब्लीसिटीचे संचालक तसेच आई एकवीरा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत भिमराव पाटील यांना यंदाच्या खान्देश भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. निगडी येथील खान्देश मराठा मंडळाच्या सभागृहात शनिवार दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी खान्देश मराठा मंडळ पिंपरी चिंचवड व पुणे परिसरच्या वतीने मंडळाच्या सभासदांचे सहकुटुंब 33 वे स्नेहसंमेलन, गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळ्यावेळी पुरस्काराचे वितरण झाले. त्याचप्रमाणे, सदाशिव खाडे (अध्यक्ष – पिंपरी चिंचवड नवनगरप्राधिकरण), सुनिल पवार (कार्यकारी संचालक, राज्य कृषी प्रचार समिती), प्रा. संजय साहेबराव पवार (सदस्य – मराठी भाषा संवर्धन समिती, पिं.चिं.मनपा.), कृष्णा व. देशमुख (कृषी संचालक, म.रा.) या मान्यवरांचा विशेष सत्कार झाला. तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. दरम्यान, सत्कारमुर्ती प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मंचावरील सर्व मान्यवरांचे तसेच खान्देश मराठा मंडळाची कार्यकारिणी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यासह खान्देश मराठा मंडळाकडून मिळालेल्या खान्देश भूषण पुऱस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.
प्रसंगी, गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार झाला. महिलांसाठी हळदी – कुंकू व तिळगुळ समारंभ, सर्व सभासदांसाठी स्वरबहार म्युझिक स्पेशल हा अंध कलाकारांचा संगीत स्वरमय कार्यक्रम पार पडला. तसेच, मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार संतोष पाटील यांच्या त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ आदर्श माता पुरस्कार परिक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थीनीच्या आईला देवून गौरव केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. उदय पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गंगाराम सखाराम पाटील, सचिव मिलींद पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, खजनदार माधव पवार, आधार पाटील, भिकनराव पाटील, सयाजीराव पाटील, भास्कर पाटील, उमेश बोरसे यांनी मेहनत घेतली.