पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पुन्हा एक पाऊल स्मार्ट सिटीच्या दिशेने टाकले आहे. ग्रीन सौदागर क्लिन सौदागर हा ध्यास मनात घेऊन प्रथमच पिंपळे सौदागर येथे ई-स्कुटर सेवा कार्यरत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या पंधरा दिवसात प्रथम टप्यात ट्रायल बेसेसवर २० ई-स्कुटर येथे दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
इलेक्ट्रॉनिक स्कुटर अर्थात (ई-स्कुटर) Android App द्वारे चालु किंवा बंद करता येते. ही स्कुटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एका तासात ६० किलो मिटरचा पल्ला गाठते. ह्या ई-स्कुटरला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात. ई-स्कुटरची टॉप स्पीड ही २५ किलोमिटर प्रति तास आहे. वाढती महागाई आणि वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी ही संकल्पना प्रथमच पिंपळे सौदागर वासियांसाठी ई-स्कुटर ही सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. ई-स्कुटर चालवण्यासाठी पाहिले १५ मिनीटांची राईड फ्री असणार आहे. त्यानंतर ई-स्कुटर चालवण्यासाठी १.५० रुपये पर मिनिट आहे. पैसे पेड करण्यासाठी UPI अँप्सद्वारे पैसे पेड करून ई-स्कुटरचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.
पिंपळे सौदागरमधील नागरिकांचे स्वास्थ व आरोग्याची काळजी घेत शत्रुघ्न काटे यांनी पिंपळे सौदागरमध्ये अनेक ठिकाणी सायकल पॉईंट केले आहेत. त्याच ठिकाणी या ई-स्कुटर पॉईंट आणि ई-स्कुटर चार्जिंग पॉईंट करणार असल्याचे काटे यांनी म्हटले आहे.