पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दि.२४ रोजी सायंकाळी ४ वाजता चिंचवड विधानसभा मतदारसंघात ‘बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आयोजक नगरसेवक मयूर कलाटे यांनी दिली.
पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ चिंचवड मतदारसंघात ‘बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. वाकड पोलिस स्टेशन येथून उद्या बुधवार दिनांक २४ रोजी सायंकाळी ४ वाजता या रॅलीची सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ही रॅली निघणार आहे. वाकड पोलिस स्टेशन येथून उत्कर्ष चौक, मानकर चौक, मेराझो हॉटेल, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, विशालनगर, मानकर चौक, काळेवाडी फाटा, सोनाई मंगल कार्यालय, अशोका सोसायटी, थेरगाव गावठाण, दगडू बारणे चौक, शरद बारणे ऑफिस, पोलीस लाईन अंडरपास, प्रेरणा पतसंस्था, मंगलनगर, वाकड फाटा, डांगे चौक, गणेश मंदिर, दुर्गा कॉलनी क्रमांक 3, चौधरी पार्क, काळाखडक, भुमकर चौक, मार्गे संत तुकाराम कार्यालय ही रँली निघणार असल्याची माहिती मयुर कलाटे यांनी दिली.