पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील जेष्ठ आदर्श माता भीमाबाई पांडुरंग काटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पिंपळे सौदागर येथील पी.के.स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे व उद्योजक सोमनाथ काटे यांच्या त्या मातोश्री होत तर नगरसेवक शत्रुघ्न काटे व पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे यांच्या त्या चुलती होत.