पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी भाजी मंडई येथील व्यापारी श्रीधर उर्फ दादा महादेव नर्के यांचे आज दि.१८ रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. पिंपरीगावातील स्मशानभूमी येथे उद्या रविवार दि.१९ रोजी सकाळी ९ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. दादा नर्के यांच्या अचानकपणे झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.