पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचा एक वर्षांचा कालावधी दि. ८ मे रोजी संपल्याने समिती बरखास्त करण्यात आली आहे. आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या समितीसाठी ९ नव्या सदस्यांच्या निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
शहर सुधारणा समिती सदस्यपदी पक्षीय संख्याबळानुसार निवड करण्यात आल्या आहेत.
भाजपा (५ सदस्य)
१. राजेंद्र लांडगे
२. लक्ष्मण सस्ते
३. सुनिता तापकीर
४. कैलास बारणे
५. आशा शेंडगे
राष्ट्रवादी (३ सदस्य)
१. संतोष कोकणे
२. वैशाली घोडेकर
३. संजय वाबळे
शिवसेना (१ सदस्य)
१. रेखा दर्शिले
दरम्यान शिवसेनेच्या रेखा दर्शिले यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.