पिंपरी (Pclive7.com):- सुवर्णा फायब्रोटेक कंपनीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण होणार खासदार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात कोण खासदार होणार याचा योग्य अंदाज देणाऱ्या नागरिकास ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड व पुणे क्षेत्रातील नामांकित लघु उद्योगांपैकी सुवर्णा फाइब्रोटेक ही कंपनी आहे. या स्पर्धेत सहभागींना पुणे जिल्ह्यातील चार संभाव्य खासदार ओळखावे लागणार आहेत. सहभागींना त्यांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक indiaonenews.net.च्या जी-मेल आयडीवर पाठवावा लागेल. जीमेल पत्ताः [email protected] असा आहे.
विजेत्यांना सुवर्णा फायब्रोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.आय.वर्गीस यांच्या हस्ते ५ हजार रूपयांचे रोख पारितोषिक आणि एक चषक प्रदान करण्यात येईल. पाच भाग्यवान विजेत्यांना गौरविण्यात येईल. भाग्यवान विजेते सोडतीमध्ये नाव न निघालेल्या नागरिकांची नावे indiaonenews.net. च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. नागरिक २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला अंदाज कळवू शकतात. विजेत्यांच्या नावाची घोषणा २४ मे रोजी होईल आणि २५ मे रोजी बक्षीस वितरित केले जाणार आहे.