पिंपरी (Pclive7.com):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर शासनाने दि.६ जून २०१९ रोजी अमित गोरखे पुणे यांची नियुक्ती केली. या अनुषंगाने दि.११ जून २०१९ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ प्रशासकीय इमारत क्र.२ बी विंग ३ रा मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, मुंबई येथील महामंडळाच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये गेल्या चार साडेचार वर्षांपासून मरगळ आलेली होती. आता महामंडळाच्या योजना कार्यक्षमपणे राबवून महामंडळास चालना देऊन महामंडळाच्या कामास गती देणार असे उद्गार महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष अमित गोरखे यांनी काढले. महामंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित गोरखे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला व महामंडळास सुस्थितीत आणण्यासाठी माझी अध्यक्ष पदी निवड केली याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा व शासनाचे गोरखे यांनी आभार मानले. तळागाळातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व तस्यम १२ पोटजातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी मला नियुक्त केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या असलेल्या अनेक योजना सुरू करण्यासाठी योजना गेल्या चार साडेचार वर्षापासून बंद अवस्थेत होत्या. त्या तात्काळ पूर्ववत सुरू करण्यासाठी कसोशीने निष्ठेने प्रयत्न करणार असा विश्वास कार्यभार स्वीकारताना अमित गोरखे अध्यक्ष यांनी व्यक्त केला.
अमित गोरखे अध्यक्ष यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यालयातील अधिकारी यांची बैठक घेऊन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेऊन महामंडळाचे पुढील कामकाजाबाबत निर्देश दिले. महामंडळाचे कामकाज पारदर्शी व सक्षमपणे करण्यासाठी सर्वांनी निष्ठेने प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त केली. या वेळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातुन अनेक कार्यकर्ते व विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक अनिल अहिरे, अपर सचिव (सा. न्या. विभाग) यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अमित गोरखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.