पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील सनशाईन गृहनिर्माण सहकारी संस्था या सोसायटीच्या दैनंदिन ओला कचरा विघटन व खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आज नगरसेवक विठल उर्फ नाना काटे व नगसेविका शितल नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
साधारण एक हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात कचऱ्याचे विघटन करून खत निर्मिती करण्यात येते. सनशाईन सोसायटीमध्ये एकूण १२५ बंगलो सदनिका आहेत. सोसायटीतील सर्व नागरिक या उपक्रमात योगदन देत आहेत, याचे नगरसेवक नाना काटे व शितल काटे यांनी कौतुक केले. व असे खत निर्मिती प्रकल्प परिसरातील सर्व सोसायट्यानी राबवावा असे आवाहन करण्यात आले.
सोसायटीच्या वतीने नाना काटे व शितल काटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे चेअरमन प्रवीण बालन, सेक्रेटरी काकासाहेब सानप, प्रवीण तिवारी, राजेश गायकवाड, डॉ.भास्करराव शेजवळ, पवन झोपे, महेश सावंत, पवन मेडीपटला, वसंत सहारे, तृप्ती सावंत, भार्गवी मेडीपटला, आदी सोसायटीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.