पिंपरी (Pclive7.com):- “बेटी बचाओ बेटी पढाओ” या वाक्याला शोभेल अशी कामगिरी युवासेना पिंपरी विधानसभा व अनिकेतभाऊ घुले मित्र परिवार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. पिंपरीतील कासारवाडी येथील ३ विद्यार्थीनींना गुरू पौर्णिमेते औचित्य साधून मदतीचा हात देण्यात आलायं.
कासारवाडीतील रहिवाशी असलेल्या किरण गायकवाड यांच्या तीन कन्या ह्या गणेश इंग्लिश स्कूल दापोडी येथे शिकत आहेत. ६ महिन्यापूर्वी झालेल्या अपघातमुळे गायकवाड कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला होता. त्यांना मुलींच्या शिक्षणाचा खर्च पेलवेना, गायकवाड कुटुंबियांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या तीन मुलींचा शिक्षणाचा खर्च युवासेना पिंपरी विधानसभा आणि अनिकेतभाऊ घुले मित्र परिवार यांनी उचलला. तसेच चालू वर्षाच्या शिक्षणाचा धनादेश प्राचार्य घारे ह्यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवानेते गोपाळ मोरे, युवा शाखाधिकारी ओंकार जगदाळे, ॲड.अजित बोराडे, राहुल राठोड, उपविभाग संघटक सनी कड, रवि नगरकर उपस्थित होते.