पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.२६ वाकड-पिंपळे निलख मधील विविध आरक्षणे विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते व महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाला.
आज दुपारी झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या ममता गायकवाड, आरती चोंधे, माजी नगरसदस्य विनायक गायकवाड, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, देवण्णा गटुरवार बाबासाहेब गलबले, उपअभियंता माधव सोनवणे, चंद्रकांत मोरे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
वाकड वेणूनगर येथील लिनियर गार्डन हे दोन्ही रस्त्यांमध्ये विकसित करण्यात येणार असुन त्यामध्ये एंन्ट्रन्स प्लाझा, स्कल्पचर, स्क्रिन वॉल, सिटींग एरिया, अँक्टीवीटी एरिया, किड्स प्ले एरिया, सेट्रंल पाथवे, फ्लॉवर शर्बबेड, जंक्शन, उभारले जाणार असून या प्रकल्पास सुमारे १ कोटी ६६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
कावेरीनगर पोलिस लाईन मधील दोन खेळाच्या मैदानांमध्ये कबड्डीचे मैदान १२० चौ.मीटर, कुस्ती हौद ३६ चौ.मीटर, कुस्ती मॅटिंग १४४ चौ.मीटरचे, जाँगिग ट्रॅक १९५ मीटर, फुटबॉलसाठी पिच २८ मीटर × १८ मीटरचे. चेजिंगरुमसह स्वच्छतागृह उभारण्यात येणार असुन प्रकल्पास सुमारे १ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे वाकड-पिंपळे निलख परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.