पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराशेजारील असलेल्या पवना नदीच्या घाटावर नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र असणाऱ्या छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते. छटपूजन महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने विरोधी पक्षनेता विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी एसीपी मोहन विधाते, डीवायएसपी नंदकिशोर भोसले पाटील, चिंचवड ट्राफिक विभागाचे खंडेराव खैरे, वाकड पोलीस स्टेशनचे चौधरी माजी नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेवक संतोष कोकणे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप काळे, विलास पाडाळे, काळेवाडीचे पोलीस पाटील सुरेश नढे यांचा सन्मान करण्यात आला.
उत्तर भारतीय नागरिकांना छट पूजा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उत्तर भारतीय नागरिक मंडळाचे ब्रिजेश सिंग, दुर्गेश सिंग, राकेश गुप्ता, धर्मेंद्र सिंग, मनन सिंग, जनार्दन सिंग, धनंजय सिंग, प्रकाश सिंग, अमरजित सिंग, शैलेश सिंग, दुवालप्रसाद मौर्य, शिवकुमार भरद्वाज, गोलू सिंग, सोनू सिंग, वीरेंद्र यादव, सुजीत सिंग, संदिप शर्मा, आलोक सिंग, विजय बहादुर प्रजापती, राजकुमार सिंग, राजू वर्मा, राजकिशोर सिंग, मुकेश सिंग इत्यादी नागरिक उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group