पिंपरी (Pclive7.com):- सांगवी- काळेवाडी मंडल अध्यक्षपदी स्वीकृत नगरसदस्य विनोद तापकीर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर माजी मंत्री राम शिंदे व आमदार लक्ष्मण जगताप व महापौर उषा माई ढोरे यांच्या हस्ते तापकीर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टी, चिंचवड विधानसभा मंडलाची संघटनात्मक निवडणूक थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालय येथे आज रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पार पडली. यावेळी सांगवी- काळेवाडी मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर आणि किवळे- चिंचवड मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी तीन वर्ष चांगल्या प्रकारे कार्य करत पदाला योग्य न्याय दिल्याने किवळे-चिंचवडचे माजी मंडल अध्यक्ष काळूराम बारणे व सांगवी-काळेवाडीचे माजी मंडल अध्यक्ष प्रमोद ताम्हणकर यांचा राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, सचिन पटवर्धन, उमा खापरे, विलास मडेगिरी, राजेश पिल्ले, अमित गोरखे, अमोल थोरात, काळूराम बारणे, प्रमोद ताम्हणकर, प्रमोद निसळ, मोरेश्वर शेडगे यांच्यासह चिंचवड मतदार संघातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. राजू दुर्गे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशामध्ये मंडल अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठे योगदान लाभले आहे. काळूराम बारणे आणि प्रमोद ताम्हणकर यांच्याप्रमाणे विनोद तापकीर आणि योगेश चिंचवडे यांनी देखील भविष्य काळात चांगले काम करावे आणि सर्वांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन जगताप यांनी केले.