पिंपरी (Pclive7.com):- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वांगिण विकासासाठी तसेच प्रगतीसाठी इंदापूर संस्थानचे डॉ.मिलींदराजे भोसले यांनी पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी स्थापना केली. तसेच या आघाडीच्या सचिवपदी युवराज भगवान दाखले यांची नियुक्ती केल्याची घोषणा आज करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मिलींदराजे भोसले यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी प्रामुख्याने शहराच्या विकासावर भर देईल. ज्या कार्यकर्त्यांना शहराच्या विकासाठी काम करायचे आहे, त्यांनी डॉ.मिलींदराजे भोसले व युवराज दाखले यांच्याशी संपर्क साधावा असे अावाहन करण्यात आले आहे.