लोणावळा (Pclive7.com):- ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. दरवर्षी ख्रिसमस नाताळ आणि नूतन वर्षाला लोणावळ्यात हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु, यावर्षी परिस्थती वेगळी असून करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नाईट कर्फ्यू चा निर्णय प्रशासनाने घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसार, २५ डिसेंबर ते ०५ जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे.
लोणावळा शहरात दरवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक हे नूतन वर्ष आणि ख्रिसमस नाताळ हा सण साजरा करत असतात. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये रात्री ११ ते सकाळी ६ असा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परंतु, महानगरात नाईट कर्फ्यू लागल्याने न्यू इयर साजरा करण्यासाठी अनेक हौसी पर्यटकांची गर्दी लोणावळ्यात होण्याची शक्यता होती.
त्याच पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांनी प्रशासनाकडे नाताळ आणि नूतन वर्षाच्या दिवशी नाईट कर्फ्यू लावण्या संबंधी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार, लोणावळ्यात देखील दिनांक २५ डिसेंबर ते ०५ जानेवारी दरम्यान रात्री नाईट कर्फ्यू राहणार असल्याचे निश्चित झालं आहे.
या परिसरात असणार नाईट कर्फ्यू….
पुणे ग्रामीण हद्दीतील पर्यटकांची व नागरिकांची लोणावळा, अँम्बी व्हॅली लवासा, भूशी डॅम, मुळशी डॅम, ताम्हीणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी तसेच फार्म हाऊस, रिसॉर्ट इत्यादी ठिकाणी नाताळ सण, नववर्षाच्या निमित्ताने मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, तसेच मावळ, मुळशी व हवेली या तालुक्यातील संपुर्ण कार्यक्षेत्रामध्ये तसेच शिरुर तालुक्यातील कोरेगाव भिमा, डिग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये दिनांक २५ डिसेंबर ते दिनांक ०५ जानेवारी २०२१ दरम्यान रात्री ११ ते सकाळी ०६ पर्यंत जमावबंदी आदेश पारित होणे आवश्यक असल्याचे नमुद केलेले आहे.