पिंपरी (Pclive7.com):- बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत मारुती शिंदे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
मंगळवारी मध्यरात्री शिंदे यांना अर्धांगवायूचा झटका आला. उपचारासाठी आकुर्डी येथील स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्राण्यज्योत मालवली. शिंदे हे मूळचे अकोला तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावचे होते.
शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या अखत्यारीत २०१० मध्ये बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र संघटना स्थापन करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात या संघटनेचे रोपटे शिंदे यांनी लावले.
आज सुमारे १५ हजारावर बांधकाम कामगार या संघटनेचे सदस्य आहेत. तत्पूर्वी या कामगारनगरीत बांधकाम कामगार दुर्लक्षित होते. जयंत शिंदे यांनी संघटनेच्या माध्यमातून हजारो कामगारांना शासकीय योजनांचे आर्थिक लाभ मिळवून दिले.





















Join Our Whatsapp Group