पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त दहावीमध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेल्या ६१ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच मोहननगर परिसरातील ६१ ज्येष्ठ नागरिकांना रोपांचे वाटप करून सन्मानित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते विद्यार्थी आणि जेष्ठांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नगरसेविक मीनल यादव, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर संघटक विशाल यादव यांच्यावतीने करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित पिंपरी शहरप्रमुख राजेशजी वाबळे, पिंपरी उपशहरप्रमुख अमोल निकम, पिंपरी चिंचवड शहर संघटक रोमी संधू, विभाग समन्वयक भाविक देशमुख, विभागप्रमुख गोरख नवघरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बाबर, विभागप्रमुख नाना काळभोर, पिंपरी चिंचवड शिवसेना संघटक विजयकुमार गुप्ता, तात्या काळभोर, तात्या शिंदे, नागेश नामदे, शशिकांत पाडाळे, मधुसूदन आंबुसकर, सोमनाथ अलंकार, चंद्रकांत कोकाटे, भाई भोसले, निखिल येवले, आशिष बाबर, शिवसेना महिला आघाडीच्या पाटील काकू, दीपाली धावडे, मोरे मामी, प्रांजल पाडेकर तसेच मोहननगर काळभोर नगरमधील अनेक नागरिक, शिवसैनिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नगरसेविका मीनल यादव, शिवसेना पिंपरी चिंचवड शहर संघटक विशाल यादव, अष्टविनायक मित्रमंडळ, शिवसेना शाखा मोहननगर यांच्यावतीने करण्यात आले होते. सूत्रसंचलन काका शेळके यांनी केले.