पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पिंपळे निलख येथील कै.नारायणराव चोंधे शिक्षण संस्थेच्या विद्या विनय निकेतन शाळेतर्फे व लायन्स क्लब यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
पिंपळे निलख येथील कै.नारायणराव चोंधे शिक्षण संस्थेच्या विद्या विनय निकेतन शाळेतर्फे व लायन्स क्लब यांच्या वतीने विद्या विनय निकेतन शाळेत दहावीत प्रथम तीन क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मराठी माध्यम – तृतीय क्रमांक – हर्षद रामचंद्र बोराडे – 88.80%, द्वितीय क्रमांक भोगेश्वरी रमेश पवार – 90.98%, प्रथम क्रमांक – कुशल भरत महाजन – 94.20% व इंग्रजी माध्यम – तृतीय क्रमांक – नम्रता दिपक कसबे – 89.40%, द्वितीय क्रमांक – कल्याणी लक्ष्मण लवटे – 90.60% प्रथम क्रमांक – सानिका बाळासाहेब इंगवले – 94.00% या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच कोविड काळात कार्य केलेल्या विशालनगर परिसरातील सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी व औषध फवारणी कर्मचारी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा ०१ ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका आरतीताई चोंधे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, बाळासाहेब चोंधे, ज्येष्ठ नागरिक उदय मोघे, सुधाकर हवेले, कचेश्वर साळुंखे, पुरुषोत्तम दोमकुंडवार,सुनिल मराठे, डॉ. रोहिदास गवळी, सुभाष इंगळे, सुधाकर वेदपाठक, किशोर नाईक, उमेश कुलकर्णी, शरद गाळणकर, विनायक लोहकरे, नामदेव साठे, वृषाली मरळ (कार्याध्यक्षा पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ), विमल गायाधनकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री जितेंद्र ठोंबरे, भरत इंगवले व पुंडलिक दरेकर तसेच पालक व विद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.