पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमधील युवानेते तथा युवा उद्योजक शिवराज काटे यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबीर आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शिवराज काटे यांचा वाढदिवस दि.२७ रोजी होता. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शिवराज काटे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांती मित्र मंडळ व विश्व हिंदू मराठा संघ यांच्यामार्फत महादेव मंदिर पिंपळे सौदागर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदरचे रक्तदान शिबिर हे थलैसिमीय ग्रस्त, गोर गरीब रुग्णांसाठी, तसेच डेंगू रुग्णांना रक्तातील प्लेटलेट उपलब्ध होण्यासाठी भरवण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात ७० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून जीवन दान दिले. सदरचे रक्तदान शिबिर हडपसर येथील अक्षय ब्लड सेंटर जनसंपर्क अधिकारी महेश रणदिवे व त्यांच्या सहकारी मार्फत भरविण्यात आले.
तसेच शिवराज काटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना अन्न वाटप, वही-पेन वाटप, गरजूंना विविध प्रकारची मदत करण्यात आले.