पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज (बुधवार दि.१२) दिवसभरात तब्बल २,०६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५९१ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला असून आज ओमिक्रॉनचा १ रूग्ण आढळला असून एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात २,०६५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ५९१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ९,४८६ इतकी झाली आहे. यातील ४५४ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ९०३२ रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
🚨 Pcmc Corona Update’s🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
बुधवार दि.१२ जानेवारी २०२२
📲 अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = २०६५
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = ०१
📉 एकूण पॉझिटिव्ह = २८९९८४
📉 सध्या शहरात रूग्ण = ९४८६
(रूग्णालय ४५४ + क्वारंटाईन ९०३२)
📉 एकूण मृत = ४५२८ (आज = ०१)(०१ Pcmc, ०० हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = २७६७०१ (आज ५९१ रूग्ण डिस्चार्ज)
📉 आज संशयित रूग्ण = ११६३०
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = ३६९६
💉 आज लसीकरण = १६११०
(एकूण = ३१२८९०६)
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥
Join Telegram Group👇👇