पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात दहा ते बारा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. शहरात आज (शुक्रवार दि.१४) रोजी दिवसभरात तब्बल २,५६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे ओमिक्रॉनचे २९ रूग्ण आढळले आहेत.
दरम्यान समाधानकारक गोष्ट म्हणजे ९९४ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला असून आज एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालेला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात आज दिवसभरात २,५६२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर ९९४ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. गेल्या आठवड्यापासून होणाऱ्या दररोजच्या मोठ्या रुग्ण वाढीमुळे आज शहरातील सक्रिय रुग्ण संख्या १२,५१५ इतकी झाली आहे. यातील ३४७ रूग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १२,१६८ रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
🚨 Pcmc Corona Update’s🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
शुक्रवार दि.१४ जानेवारी २०२२
📲 अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = २५६२
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = २९
📉 एकूण पॉझिटिव्ह = २९४८२३
📉 सध्या शहरात रूग्ण = १२५१५
(रूग्णालय ३४७ + क्वारंटाईन १२१६८)
📉 एकूण मृत = ४५२८ (आज = ०१) (०० Pcmc, ०१ हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = २७८५११ (आज ९९४ रूग्ण डिस्चार्ज)
📉 आज संशयित रूग्ण = ११५१२
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = ४७४६
💉 आज लसीकरण = १६९०९
(एकूण = ३१४७०४६)
🏥 Source – PCMC Health Dept. 🏥
Join Telegram Group👇👇