पिंपरी (Pclive7.com):- काळभोरनगर येथील हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश बाराहाते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते सतीश बाराहाते यांना हे निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सौ.गंगाताई धेंडे, संतोष वाघेरे पाटील, विनायक काळभोर आदी उपस्थित होते.