आळंदी (Pclive7.com):- आळंदी येथील श्रीराम धर्मशाळा या नूतन वास्तूचा वास्तुशांती सोहळा तसेच सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व सत्कार समारंभा निमित्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा या कार्यक्रमात ज्येष्ठ मंडळींचा बाबुराव बांगर ,तुकाराम बांगर,शांताराम बांगर,दगडू पोखरकर,नारायण अरगडे यांचा गृहमंत्री दिलीप वळसे पा.यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धर्मशाळेच्या नवीन इमारतीसाठी योगदान लाभलेल्या व्यक्तींचा ही त्यांच्या हस्ते सत्कार येथे करण्यात आला.
तसेच पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर साहेब, सहायक पोलीस उपायुक्त चाकण विभाग प्रेरणा कट्टे मॅडम, आळंदी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे साहेब व आळंदी ग्रामस्थ यांचा श्रीराम धर्मशाळेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले ज्यांनी आपली हयात गावच्या व समाजाच्या विकासासाठी व भल्यासाठी तसेच आध्यात्मिक कार्यासाठी घालवली त्यांचा सत्कार आपण येथे केला. त्यांच्या केलेल्या कामाबद्दल व कर्तृत्वाबद्दल एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्याचा काम येथे करण्यात आले. या ज्येष्ठ व्यक्तींना अजून दीर्घ आयुष्य लाभो माऊलींच्या चरणी प्रार्थना.
यावेळी आंबेगाव-शिरूर विधानसभा राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष मानसिंग भैय्या पाचुंदकर आळंदीचे मा.नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पा, मा.नगरसेवक डी.डी.भोसले पा,मा. नगरसेविका मंगलाताई वेळकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मा.नगरसेवक प्रदीप बवले, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी संदेश तापकीर, पुष्पाताई कुऱ्हाडे, रुपालीताई पानसरे, गौरी गोळे, मंगल कोळी, विठाबाई गुंड, बुर्डे ताई, सतिश कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे तसेच पत्रकार दिनेश कुऱ्हाडे,ज्ञानेश्वर कुऱ्हाडे हे उपस्थित होते.
माऊली मंदिरास ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.देवस्थान कमिटी तर्फे शाल, श्रीफळ, माऊलींची मूर्ती व ज्ञानेश्वरी देऊन पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे पा.व विश्वस्त अभयजी टिळक यांच्या हस्ते गृहमंत्री दिलीप वळसे पा. यांचा सत्कार करण्यात आला.