पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भोसरी भागात एक गरुड पक्षी जखमी झाला होता. माजी नगरसेविका अनुराधा गोफणे आणि सामाजिक कार्यकर्ते देविदास मामा गोफणे यांच्या सतर्कतेमुळे त्या जखमी गरुड पक्षाला जीवदान मिळाले.
याबाबत देविदास गोफणे माहिती देताना म्हणाले की, गवळीनगर भोसरी प्रभागातून फोन आल्यानंतर माजी नगरसेविका अनुराधा गोफणे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी दीपक कोटियाना यांच्याशी तत्काळ संपर्क केला. त्यानंतर वन्य पशु, पक्षी संरक्षण सामाजिक संस्था विनायक शिवाजी बडदे वन्यजीव सर्परक्षक यांच्याशी संपर्क साधला व सविता टकले यांच्या घरामागील मोकळ्या जागेतून जखमी गरुड पक्षाची सुटका केली. त्यानंतर त्या गरुड पक्षाला पुढील उपचारासाठी पशु वैद्यकीय रुग्णालयात पाठवले.
त्यावेळी देवीदास मामा गोफणे, अमोल अरगडे, प्रवीण पवार व रोहन कचरे इत्यादी उपस्थित होते. परिसरातील सर्वांनी माजी नगरसेविका अनुराधा देविदासमामा गोफणे यांचे आभार मानले.