पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी येथे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि महिला अध्यक्षा कविता आल्हाट, शिक्षक सेलचे शहराध्यक्ष प्रा.डॉ. संदीप तापकीर यांच्या हस्ते नवीन शिक्षक सेल शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी विनायक रनसुबे, यांनी प्रस्थाविक करून कार्यक्रमाचे संचालन केले. प्रा. संदीप तापकीर यांनी शिक्षक सेलची ध्येय धोरणे आणि राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या माध्यमातून करण्यात येणारे उपक्रम या विषयी माहिती दिली.
नव नियुक्त पदाधिकारी खालील प्रमाणे..
हितेश शर्मा – कार्याध्यक्ष, डॉ.प्रकाश पाटील उपाध्यक्ष, प्रा.संतोष भांगे, प्रा. प्रज्ञा कड, प्रा.सरिता सस्ते, प्रा. पंतोजी शेळके, प्रा. हिरामण सस्ते, सारिका तवर, सुनील दोरवे, स्वाती मोरे, स्वाती मेहेत्रस, प्रा. संजय चव्हाण, प्रा.अनिता मालुसरे हे सर्व नवीन पदाधिकारी शिक्षक सेलमध्ये आहेत.
प्रा.कविता आल्हाट यांनी नव नियुक्ती शिक्षक सेल पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आणि राष्ट्रवादी पक्षाचा विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचवावे असे प्रतिपादन केले. अजित गव्हाणे यांनी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करून अभिनंदन केले. शिक्षक हे समाजातील महत्वाचे प्रेरणादायी आणि समाज घडवणारे घटक आहे. तसेच समाज व विद्यार्थी घडवण्यात राष्ट्राच्या विकासात मोलाचा वाट शिक्षकांचा आहे असे अजित गव्हाणे यांनी आपले विचार मांडले. सर्व नवनियुक्ती पदाधिकारी यांना पुढोल कार्यास शुभेच्या दिल्या.