पिंपरी (Pclive7.com):- ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ निमित्त रहाटणीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रभात फेरी काढण्यात आली, प्रभात फेरी शाळेच्या प्रांगणातून शिवार चौक, शिवार चौक ते शाळा अशी काढण्यात आली. जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता कि जय, हर घर तिरंगा स्वतंत्रता का लगाओ नारा अशा विविध घोषणा देत मुलांनी सहभाग घेतला.
या उत्सवाच्या वेळी कॅप्टन साहिल बलोत्रा (औंध मिल्ट्री कॅम्प),याच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी वसंत चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार , रणजित बागल (नाईक) (औंध मिल्ट्री कॅम्प) सुरेश भालेराव (माजी पोलीस निरीक्षक), आर. डी. भालेराव (जेष्ठ नागरिक), सिमा शर्मा (वकील. पिंपळे सौदागर ), संजय सोनार, ट्रेजटर लायन महेंद्र परमार, लायन अंजुम सय्यद उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगने, अमोल घोलप, संतोष कापसे, शशी जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्त चित्रकला स्पर्धा व निबंध स्पधेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी सातवी आणि नवनी च्या विद्यार्थिनींनी देश भक्तिपर गीतावर नृत्य सादर केले. तसेच आठवी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले. कॅप्टन साहिल बलोत्रा यांनी मार्गदर्शन केले व ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्या. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,कार्यक्रमात उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनंदा साळवी मॅडम यांनी केले. तसेच पाहुण्यांचे आभार रेणू वर्मा मॅडम यांनी केले.