पिंपरी (Pclive7.com):- महावितरणाच्या भोसरी विभागाअंतर्गत मोशी शाखेतील २२ के.व्ही जलवायु फिडर महत्वाचे दुरुस्ती काम रविवारी (दि.११) होणार आहे. त्यामुळे काही भागातील विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे सेक्टर नंबर ४, ६ व ९, केंद्रीय विहार, जलवायु विहार, गर्धवनगरी , इंद्रलोक कॉलनीतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती महावितरणाचे भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.