पिंपरी (Pclive7.com):- ओला कचरा व्यवस्थापन संदर्भात योग्य तो मार्ग काढून कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की परिसरातील ओला कचरा व्यवस्थापन बाबत घेतलेला निर्णय अंमलबजावणी करण्यासाठी सोसायट्यांना आवश्यक तेवढा कालावधी देण्यात यावे तसेच ओला कचरा व्यवस्थापन संदर्भात योग्य तो मार्ग काढून कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी विनंती केली आहे.
यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले आहे की ओला कचरा व्यवस्थापन बाबत योग्य तो निर्णय घेऊन या बाबत कुठलेही कठोर कारवाई करणार नाही आणि आवश्यक तेवढे वेळ सोसायटी यांना उपलब्ध करून देऊन मुदत वाढ देण्यात येईल.
यावेळी माजी महापौर उषा (माई) ढोरे ,माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, सागर अंघोळकर आणि उषा मुंढे उपस्थित होते.