पिंपरी (Pclive7.com):- टाटा मोटर्स कंपनीसमोरील चिखली रोडवरील शिवतेजनगर येथे आज (दि.०३) दुपारी पुष्ठ्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. सुमारे एक तासांच्या अथक परिश्रमानंतर टाटा मोटर्सच्या अग्निशामन दलाने ही आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी अडीच वाजता चिखली रोडवरील टाटा मोटर्स कार प्लांटच्या समोर एका पुष्ठ्याने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. ही आग खूप मोठी होती. त्यानंतर टाटा मोटर्सच्या अग्निशामन दलाने ती आग आटोक्यात आणली.
जवळजवळ एक तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर ट्रकचे खूप मोठे नुकसान झालेला आहे. जुन्या आरटीओ जवळ शिवतेजनगर या ठिकाणी ही घटना घडली.