पिंपरी (Pclive7.com):- दिल्ली, पंजाब, गुजरात पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये ही आम आदमी पार्टीची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. आज चऱ्होलीतील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळजे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. हा प्रवेश आप प्रवक्ते प्रकाश हगवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजपचे प्रथम महापौर नितीन काळजे यांच्याच प्रभागातून दत्तात्रय काळजे हे आप कढुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

प्रवेशानंतर बोलताना दत्तात्रय काळजे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. भाजपच्या सत्तेला ही जनता कंटाळलेली आहे. येणाऱ्या काळात आम आदमी पार्टीची सत्ता पिंपरी चिंचवडमध्ये आल्यास गोरगरीब यांना सुख सुविधा मिळतील. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये केलेले काम अतिशय चांगले आहे. या कामाचा जगामध्ये डंका वाजला आहे. त्यांचे काम व प्रामाणिक पक्ष हे बघून मी आपमध्ये प्रवेश केला आहे असं त्यांनी सांगितले.
यावेळी आम आदमी पार्टी डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ.अमर डोंगरे, आप पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, सीताताई केंद्रे, भिम मांगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags: आपमध्ये प्रवेशआम आदमी पार्टीचऱ्होलीचऱ्होलीतील दत्तात्रय काळजे यांचा आपमध्ये प्रवेशदत्तात्रय काळजेपसंतीपिंपरी चिंचवड महापालिकास्थानिकस्थानिकांचीही आम आदमी पार्टीला पसंती





















Join Our Whatsapp Group