पुणे (Pclive7.com):- पुण्यात आज (मंगळवार) आणखी एक आगीची घटना घडली आहे. शहरातील शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
सुदैवाने बसमधील ४२ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.
या आगीत बसचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पुण्यातील अत्यंत रहदारीचा असा हा शास्त्रीनगर परिसर आहे आणि याच परिसरातील रस्त्यावर यवतमाळ ते चिंचवड या शिवशाही बसला आग लागली होती.