पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने दि.३ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार ताम्हाणे, शहर सरचिटणीस संकेत जगताप, शहर संघटक गणेश गायकवाड यांनी शहरातील ‘रिजेंट बँक्वेट हॉल’ डांगे चौक येथे दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला शहरातील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी धोरणात्मक कार्यक्रम राबवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रविकांत वर्पे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस मयूर जाधव, प्रसाद कोलते, कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर लवकुश यादव, नितीन सूर्यवंशी,प्रकाश डोळस, मंगेश बजबळकर, निखिल घाडगे, प्रतीक साळुंखे,विशाल पवार , सुरेंद्र सुरोशे, शादाब खान, प्रसाद तरस, महेश गोरे, मंगेश आसवले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.