आळंदी (Pclive7.com : प्रसाद बोराटे):- आळंदी ग्रामीण रुग्णालयात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट व मोड्युलर डिलिव्हरी रूमचे उदघाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण कल्याण समितीची बैठक आयोजित केली होती. त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रुग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या व त्यासंदर्भात उपाय योजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी ते म्हणाले रुग्णालयाचे कामकाज समाधानकारक असून कार्तिकी यात्रेच्या संदर्भात नियोजन उत्तम केले आहे. डॉ.यम्पल्ले नागनाथ, आळंदी ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.ऊर्मिला शिंदे, डॉ.एस.आर. कोलाट व वरिष्ठ लिपिक कविता भालचिम यांनी रुग्णालया संबंधित माहिती व कार्तिकी यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या नियोजनाबाबत माहिती त्यांना दिली. यावेळी राष्ट्रवादी नेते डी.डी. भोसले पाटील, पोलिस निरीक्षक रमेश पाटील, पोलीस निरिक्षक शहाजी पवार, सतीश चोरडिया, शहर अभियंता संजय गिरमे, संतोष पवार, पांडुरंग गावडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.