पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागातून येऊन लोक या ठिकाणी नोकरी करत वास्तव्यास आहेत. परंतु आजच्या या धगधगीच्या जीवनात महिलाही संसार उभारणीसाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जिद्द ठेवून आहेत. परंतु विस्तारलेल्या शहरात महिलांसाठी करण्याजोगे काम उपलब्ध नसल्याने गरजू महिला कामगारांची विवंचना होत असून पिंपरी चिंचवड शहरातील कर्तबगार व कामाची जिद्द असणाऱ्या महिलांसाठी आपल्या सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
त्यातच काहींना लघुउद्योग काहींना घरगुती उद्योग तर काहींना कंपन्यांमध्ये काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. तरी या सर्वांचा विचार करत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने लघुउद्योग प्रकल्पाची निर्मिती करावी अश्या मागणीचे निवेदन उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांना पिंपरी चिंचवड बाळासाहेबांची महिला सेना व युवासेनेकडून देण्यात आले.
ह्यावेळेस खासदार श्रीरंग अप्पा बारणे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, शहरसंघटीका सरिता साने, शैला निकम, निखिल येवले, पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके, चिंचवड युवाअधिकारी माऊली जगताप उपस्थित होते.