पिंपरी (प्रतिनिधी):- छटपुजेनिमित्त विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोशीतील इंद्रायणी घाटावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये शामबाबू गुप्ता, अक्रम शेख, प्रमोद गुप्ता, सुनिल सिंह, संजय विश्वकर्मा, देवेंद्र पासवान, रामेश्वर गौड, फुलचंद राम, उमेश सिंह, राजकुमार गुप्ता, रोहित प्रसाद आदींनी सहभाग घेतला.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने छटपुजेनिमित्त मंगळवार दि.२४ ते शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर पर्यंत मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य छटपुजा आणि इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. या महोत्सवात नदी संवर्धनाचा संकल्प करीत ‘इंद्रायणी मातेची भव्य गंगा आरतीचा’ मुख्य आकर्षणाचा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. वाराणशी (काशी) येथील गंगेच्या घाटावर ज्याप्रमाणे गंगेची आरती करण्यात येते त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच मोशीत इंद्रायणी घाटावर भव्य गंगा आरती होणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ॲड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि स्थानिक नगरसेवक आदी प्रमुख मान्यवरांसह शहरातील उत्तर भारतीय समाज बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी (दि.२४) सायंकाळी स्नान ध्यान, बुधवारी (दि.२५) खरना, छोटकी छट (रसियाव रोटी), गुरुवारी (दि.२६) डाला छट व्रत (संध्या अर्ध्य) भव्य मातेची गंगा आरती, शुक्रवारी (दि.२७) पहाटे ५.३० वाजता सुर्योदय अर्ध्य, ६.३२ वाजता सुर्यदर्शन गंगा आरतीने महोत्सवाची सांगता होणार आहे.