पिंपरी (Pclive7.co.):- पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कावेरीनगर येथे जिल्हा स्तरीय शालेय ज्युडो २०२२ / २३ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जाधववाडी येथील ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन करून संस्थेचा नावलौकिक केला आहे.
ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालयातील आर्यन दत्तात्रय जाधव याने सुवर्ण पदक, ओम दत्तात्रय जाधव याने रौप्य पदक, कृष्णा सोनवणे याने कांस्य पदक, हर्षवर्धन आडे याने रौप्य पदक पटकाविले. या चिमुकल्यांच्या पराक्रमाने शाळेचे नाव लौकीक तर झालेच परंतु शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला.
समाजाच्या विविध स्तरातून या चिमुकल्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळेतर्फे या विद्यार्थ्यांचे शाळेच्या संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला राऊत व मुख्याध्यापिका वर्षा लोखंडे यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले. डायनॅमिक शिवकालीन मर्दानी आखाडा जाधववाडीचे प्रशिक्षक प्रवीण मेळावणे यांच्या आखाड्यात सराव करीत आहेत.