सातारा (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे आमदार व सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमी लगत हा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी पुलावरून ३० फूट खोल खड्ड्यात कोसळली गेली.

अपघातात माण खटावचे आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. ही घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. या अपघातात आमदार जयकुमार गोरे जखमी झाले आहेत. पुण्यातील रुबी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. भाजपाचे आमदार राहुल कूल, कार्यकर्ते रुबी रुग्णालयामध्ये उपस्थित आहेत. गोरे यांचे नातेवाईक साडेआठ वाजेपर्यंत रुग्णालयामध्ये पोहचतील अशी माहिती समोर येत आहे.
गोरेंबरोबरच गाडीमधील इतर दोघे किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आलं आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचा सुरक्षारक्षक या अपघातात जखमी झाले आहेत. दोघांवरही फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे ते मुंबईवरून त्यांच्या निवासस्थानी जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, गोरे यांची गाडी पुलाचा कठडा तोडून थेट खाली ३० फूट खोल नदीत कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार गोरे हे शुद्धीत असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.





















Join Our Whatsapp Group