पिंपरी (Pclive7.com):- कॅनाडा येथील वर्क व्हिजा करून देण्याचा बहाणा करीत आरोपीने फिर्यादी व फिर्यादीच्या पतीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी फिर्यादीकडून एकुण ७,५८,००० रुपये घेवुन कोणत्याही प्रकारचा वर्क व्हिसा काढुन दिला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना २२ फेब्रुवारी २०२२ ते आजपर्यत फिर्यादी यांचे राहत्या घरी व कॅम्प पुणे येथे घडली. २६ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी महिला आरोपी, वनराज उर्फ पुष्कराज यश भाटे (लेन नं. १ गणेश अपार्टमेंट, संतोषनगर, रा. कात्रज) यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.