पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांना जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत ट्विट करून ही माहिती दिली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230203-WA0023-300x150.jpg)
जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.