चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई (आठवले गट), रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, प्रहार संघटना, महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.२३) शहरात येणार आहेत.
यावेळी पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे निलख, वाकड येथील सोसायटी धारकांसाठी त्यांच्या उपस्थितीत नागरी संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आज गुरूवार दि.२३ रोजी सायंकाळी ८ वाजता हा नागरी संवाद कार्यक्रम संपन्न होणार आहे.