पिंपरी (Pclive7.com):- लवकरच उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे. अशावेळी सुट्टीत मुलांना मनसोक्तपणे खेळता यावे, वाचन करता यावे, आवडीच्या छंदात मन रमवता यावे, यासाठी पालक मुलांना वेगवेगळ्या छंद वर्गात, व्यक्तिमत्व विकास वर्गांना पाठवत असतात. सुट्टी टीव्ही किंवा मोबाईलच्या आहारी आपला पाल्य जाऊ नये असे सगळ्याच पालकांना वाटते. यासाठी विश्व हिंदू परिषदेने यावर्षी सुट्टीत मुलांसाठी व्यापक संस्कार वर्गाचे आयोजन केले आहे.
या वर्गात मुलांना खेळ, गोष्टी, गप्पा, गाणी, श्लोक, पाठांतर इत्यादी गोष्टी शिकविण्या बरोबरच सूर्यनमस्कार, योगासने, चित्रकला, कागदी काम, मातीपासून वस्तू बनवणे, भाषण कसे करावे इत्यादी विविध गोष्टी मुलांकडून करून घेतल्या जाणार आहेत.
असे वर्ग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी एका प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. ज्यांना असे वर्ग घ्यायचे आहेत त्यांनी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन परिषदेचे प्रदेश मंत्री संजय मुद्राळे यांनी केले आहे.
श्री. नंदकुमार कुलकर्णी
+918805026569
यांना संपर्क साधावा.