पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मधील पिंपळे सौदागर परिसरातील रोझलँड रेसिडेन्सी ही एक उच्चभ्रू आणि प्रथितयश सहकारी गृह रचना संस्था म्हणून ओळखली जाते. सोसायटीमध्ये आर्थिक व्यवहार व इतर काही कारणामुळे सभासदांनी केलेल्या तक्रारीवरून उपनिबंधकाने सोसायटीचे माजी चेअरमन संतोष म्हसकर, सेक्रेटरी आणि इतर संचालक मंडळास पाच वर्षासाठी अपात्र घोषित केले होते. सदर मंडळानी बचावासाठी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून लोकशाही विचारात घेता अवघ्या पंधरा दिवसात सोसायटीची निवडणूक निवडणूक लक्षात घेऊन सदर निर्णयास स्थगिती दिली होती.
पंधरा दिवसांसाठी संचालक मंडळ पूर्ण प्रस्थापित झाले, पण काळास ते मान्य नव्हते. रविवार दिनांक 25 जून रोजी झालेल्या निवडणुकीत सोसायटीतील सभासदांनी त्यांना साफ नाकारले. 75 ते 80 टक्के मतदान घेऊन परिवर्तन पॅनलचे 17 उमेदवार निवडणुकीतून आणि 1 बिनविरोध असे 18 आणि रोझलँड रेसिडेन्सी पॅनलचा 1 बिनविरोध असे एकूण 19 उमेदवार विजयी झाले.
382 सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क..
श्री विजय मारणे, श्री संदीप ठेंगे, नरेंद्र आहिरे, श्री सखाराम देशपांडे, श्री. प्रशांत पाटील, सौ. सुनंदा गवळी, डॉ. वर्षा घाळी, श्री.तेजसकुमार मिस्त्री, श्री पंकज पांधी, श्री राजीव रंजन प्रसाद, श्री विनीत सक्सेना, श्री. विक्रम शिंदे, श्री. हरी श्रीवास्तव, श्री किशोर सोनय्या, बबिता बॅनर्जी, सौ. वैशाली मकरंद देशपांडे, श्री महेश चौधरी, श्री निखिलेश पुंडे, श्री मिथुन गोडबोले.
निकालानंतर सोसायटीतील सर्व विजयी उमेदवारांनी आणि रहिवाशांनी प्रथम सोसायटीतील राधाकृष्ण मंदिर आणि श्री हनुमान मंदिर यांचे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर सोसायटीतील सर्व सभासद रहिवाशी महिला मुलांनी फटाके डीजे गुलाल भंडारा उडवून पेढे बर्फी वाटून दिवाळी साजरी केल्यासारखा जल्लोष करत आनंद व्यक्त केला. या प्रक्रियेदरम्यान श्री.संदीप जाधव, श्री. चंदन चौरसिया आणि श्री. विशाल मारणे आणि इतर सभासद युवाशक्ती यांनी मोहिमेचे नेतृत्व केले आणि संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सगळ्यांना एकत्र केले.
पिंपळे सौदागर व पिंपरी चिंचवड परिसरातील विविध मान्यवर श्री शंकर शेठ जगताप, विठ्ठल उर्फ नाना काटे, शत्रुघ्न उर्फ बापू काटे, निर्मलाताई संजय कुटे, प्रभाकर वाघेरे, संजय भीसे, ऋषिकेश संजोग वाघेरे (पाटील), बाळासाहेब वाघेरे, नंदकुमार काटे, संजय भिसे, गोविंद काटे, शंकर काटे, कैलास कुंजीर, संभाजी वाघेरे, गिरीश जाचक आणि विविध मान्यवरांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांना भेटून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.