तब्बल तेरा वर्षानंतर एकाही साक्षीदाराने सरकार पक्षाच्या बाजूने साक्ष न दिल्याने व त्या वेळच्या काही पोलिसांनी जबरदस्ती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे मेहरबान न्यायालयात शपथेवर सांगितले. तसेच शरद मोहोळ व इतरांकडून गुन्ह्यात कोणत्याही प्रकारची मालमत्तेची जप्ती सिद्ध होऊ शकली नाही. या सर्व गोष्टींचे अवलोकन करून न्यायालयाने शरद मोहोळ याच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, कर्नाटक मधील चेन्नास्वामी स्टेडियम येथील बॉम्बस्फोट, दिल्ली येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील कुख्यात आतंकवादी कातील सिद्धकी याच्या खुनाच्या गुन्ह्यातून दोन वर्षांपूर्वी शरद मोहोळची निर्दोष मुक्तता झाली होती. येरवडा कारागृहातील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये कातिल सिद्दिकी याची बर्मुडाच्या नाडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग, ॲड.सौरभ तडवी, ॲड. बिलाल मणियार, ॲड.तानाजी सोलणकर, ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले.